Home » ओळख » उद्दिष्टे

उद्दिष्टे

Advertisements

आमची बहुतेकांची एकमेकांशी ओळख झाली इंटरनेटमुळं. विचार करणं (आणि ते दुसऱ्याला ऐकवणं) हा एकमेव समान धागा. कोण, कधी, कशावरून, कुणाशी सहमती अथवा मतभेद व्यक्त करील याचा नेम नाही. आणि हा नसलेला नेमच घट्ट वीण जुळण्यासाठी कारणीभूत ठरला. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुणाला या विषयात गती तर कुणाला त्या विषयात गती. आणि कुणीही कुणालाही कशावरही प्रश्न करण्याची एकमेकाला न बोलता दिलेली मुभा हा गाभा.
हे असं सगळं असल्यानं चर्चा करायला एक विस्तृत माध्यम हवं म्हणून एक आपल्यापुरता एक कट्टा निर्माण करण्याची गरज ही या संकेतस्थळाची माता.

उद्देश:
१.  कशावरही चर्चा करणे
२.  वाद (कधी कधी वितंडवाद) घालणे
३.  कला, साहित्य यातील नसलेल्या ज्ञानाचे नियमीत प्रदर्शन करणे
४.  कधी कविता कधी लेख होतात हे दाखवणे
५.  ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांना आपणच राजकारण शिकवलं आणि देशाच आपल्याशिवाय पान हलत नाही हे माहीत असल्यानं त्यावर भाष्य करणे
६.  आणिक काही स्पृश्यास्पृश्य विषय असतील तर त्यावरदेखील अधून मधून  हात साफ करून घेणे.

अपेक्षा:
१.  साईट आमची”च” आहे, सबब नियम आमचे”च” असतील
२.  भाषा कधी मराठी कधी इंग्रजी आणि कधी इतर अशा वापरल्या जातील
३.  जोपर्यंत लिखाण वैयक्तिक नाही तोपर्यंत सभ्य भाषा वापरण्याची सक्ती नाही
४.  सर्व लिखाणाचे मालकी हक्क मूळ लेखकाकडे असतील

Advertisements
%d bloggers like this: